रात्र सरता सरत नाही…
प्रसूतीगृहातून सकाळी घरी आणता इवल्याशा गोड बाळाला,
रात्री बाळ रडत असतं,
आणि तुम्ही असता हवालदिल.
सुचेल ते सगळं करून झालं तरी रडं काही थांबत नाही.
सकाळच्या आनंदाश्रूंच्या जागी आता
असहायतेचं पाणी वाहत असतं.
रात्र अगदी सरता सरत नाही…
बाळाला खांद्यावर घेऊन थोपटत, अंगाई म्हणत,
रात्रभर येरझाऱ्या घालत राहता, डोळ्याला डोळा लागत नाही.
तापानं अंग फणफणलेलं, नेहमी लुकलुकणारे डोळे निस्तेज, चेहरा मलूल,
काय झालं असेल म्हणून तुम्ही इंटरनेट धुंडाळत बसता,
अवेळी डॉक्टरांना फोन करताना अवघडूनही जाता…
रात्र सरता सरत नाही…
बाळं शाळेत जायला लागतात,
आणि तुम्ही रात्री विचार करत बसता,
मुलं शाळेत रुळतील नां? चांगले मित्र जोडतील नां?
मोठेपणी काय होतील? आपण त्यांना सगळं देऊ शकू नां?
शरीर थकलेलं असलं तरी भुंगा मनाला पोखरतच राहतो…
रात्र सरता सरत नाही…
गाडीत मागच्या सीटवर नाचत, गाणी म्हणत, चिवचिवाट करणारी मुलं,
आताशा स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून बसतात.
पूर्वी साध्या साध्या गोष्टींसाठी प्रश्न विचारून भंडावून सोडणारी मुलं,
आजकाल आपल्या प्रश्नांना उत्तरंही देत नाहीत.
‘त्यांचं सगळं ठीक चाललं असेल नां? काही प्रॉब्लेम तर नसेल नां?’
तुमची झोप पार उडते, विचार पिच्छा सोडत नाहीत…
रात्र काही केल्या सरत नाही…
ती म्हणते, ‘मैत्रिणीकडे चाललेय, उद्या सकाळी येईन’.
तो सांगून जातो, “रात्री यायला उशीर होईल, जेवायला वाट पाहू नका”.
तुमचं विचारचक्र चालूच असतं,
ती नक्की मैत्रिणीकडेच गेली असेल नां?
तो आत्ता बाहेर काय करतोय?
रात्र सरतच नाही…
खरंय नां? किती अनंत असतात या रात्री…
पण वर्षं?
दुपट्यात गुरफटलेल्या छकुलीला
पाळणाही अपुरा कधी पडायला लागतो कळतच नाही…
वर्षं किती भुर्रकन उडून जातात…
तुमचं घट्ट पकडलेलं बोट सोडून चिमुकला
जेंव्हा शाळेकडे पावलं टाकत निघतो तेंव्हा कळतं,
वर्षं किती भुर्रकन उडून जातात…
बोबडे बोल बोलत, आणि तुमचे केस ओढत कुशीत पहुडलेली मुलं,
स्वतःच्या केसांच्या स्टायली केंव्हा करायला लागतात कळतही नाही…
वर्षं कशी भुर्रकन उडून जातात…
कधी एकदाचा झोपतोय असं वाटायला लावणारा बाब्या
सकाळचे दहा वाजले तरी उठत नाही तेंव्हा जाणवतं…
वर्षं किती भुर्रकन उडून जातात…
जिचा हात पकडून तुम्ही तिला टाटा करायला शिकवलंत,
ती जेंव्हा तुम्हालाच टाटा करून नवर्यासोबत निघून जाते तेंव्हा प्रकर्षानं जाणवतं…
वर्षं किती भुर्रकन उडून जातात…
जेंव्हा आपली बाळं आपलेच पालक होतात,
ज्या रस्त्यांवर आपण चाललो त्यांवर ती धावत असतात,
जेंव्हा आपलं हळवं प्रेम आपल्याच काळजात कळ आणतं…
तेंव्हा आपल्याला पक्कं समजलेलं असतं…
रात्री सरता सरत नाहीत,
पण वर्षं मात्र भुर्रकन उडून जातात.
__________________________________________
मूळ इंग्रजी लेखिका : जिंजर ह्यूझ
स्वैर अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
९४२२८७०२९४
👌🙂 छान!
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteअप्रतिम.
ReplyDeleteधन्यवाद वैभव!
ReplyDeleteसुन्दर.
ReplyDeleteधन्यवाद 🙂🙏
Deleteवा! छान भाषांतर आणि छान शब्दबद्धही केलंय. गुलजारसाहेबांची आठवण झाली. त्यांचंही असंच काहीतरी असतं, छोटे आणि सोपे शब्द,पण विचार करायला लावणारं.
ReplyDeleteधन्यवाद 🙂🙏
Deleteबढिया
ReplyDeleteधन्यवाद 🙂🙏
Deleteविषयाला धरुन पण काहीस स्वैर लेखन व त्याच स्वैर रूपांतर दोन्हीही छान .
ReplyDeleteतस हे काम अवघड पण छानच उतरलय.
धन्यवाद श्री.आनंदजी. मित्रगोत्री
धन्यवाद 🙏
Deleteअप्रतिम आनन्द . पालकांच्या भावना खूप छान रितीने शब्दबद्ध केल्या आहेत .
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteउत्तम लेख आणि उत्कृष्ट भाषांतर.
ReplyDeleteमिलींद रानडे
धन्यवाद 🙏
ReplyDeleteVery nicely narrated sir. Hats off to your writing skill
ReplyDeleteधन्यवाद 🙂🙏
Deleteवाचणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर स्वतः चा जीवनपट सरकला असणार, हे नक्की
ReplyDeleteखरंच. 🙂
Deleteअभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
खरंच सुंदर! वर कुणीतरी गुलजारजींच नाव घेतलं. मलाही तसंच वाटतं. त्यांच्या काही कवितांचं वाचन ऐकलं आहे.
ReplyDelete🙏🙏😊
धन्यवाद 🙏
Deleteअप्रतिम अनुवाद !
ReplyDeleteखरं तर , अनुवाद वाचतोय हे शेवटपर्यंत कळलेच नाही, एवढी सहजशीलता जाणवली .
धन्यवाद !
( शशिकांत गुजर )