Tuesday 17 August 2021

काबूलचा पाडाव आणि श्रीनगरचा बचाव

अखेर काल काबूल तालिबान्यांच्या हाती पडले. 

हे सर्व नाट्य अफगाणिस्तानात घडत होते तेव्हा सहजच, माझे मन श्रीनगरला पोहोचले. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने काश्मिरात घुसखोरी करून, जेंव्हा संपूर्ण काश्मीर बळकावण्याचा कुटिल डाव रचला होता, तेंव्हा मी त्या घटनेचा साक्षीदार होतो. ब्रिटिश आणि पाकिस्तान लष्करांच्या संगनमताने, काही तासांच्या आतच घुसखोरांनी मुझफ्फराबाद घशात घातले. त्यानंतर श्रीनगरवर मुसंडी मारून, काश्मीर ताब्यात घायचे आणि पाकिस्तानमध्ये विलीन करून टाकायचे, अशी ती  योजना होती. 

परंतु महाराजा हरी सिंह, आणि त्यांचे चीफ ऑफ स्टाफ, ब्रिगेडियर राजेंद्र सिंह यांनी, राजधानीमध्ये हाताशी असलेल्या शंभर डोगरा सैनिकांसह, ही योजना हाणून पाडण्यासाठी झुंजायचा निर्णय घेतला. त्यांच्या त्या निर्णयामुळेच, भारत सरकारला काश्मीर वाचवण्यासाठी ५ दिवस मिळू शकले. २७ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीर राज्य भारतात विलीन झाले, आणि या जवळजवळ एकतरफी असलेल्या युद्धात भारतीय सैन्याने उडी घेतली. 

भारतीय सैन्याच्या आगमनापर्यंत काश्मीर राज्य कसेबसे तग धरून होते. चालढकल करत राहण्याच्या माउंटबॅटन यांच्या नीतीला जर पंतप्रधान नेहरू बळी पडले नसते, तर आपण बारामुल्लाही वाचवू शकलो असतो. पुढे आपल्याला बारामुल्ला परत मिळवण्यासाठी शर्थ करावी लागली नसती. आजवर जगासमोर पूर्णपणे न आलेली ही एक दीर्घकथा आहे, जी आता हळूहळू सांगितली जात आहे. पंतप्रधानांच्या 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमाचे आभार मानावेत तेवढे कमीच पडतील. 

काश्मीर वाचवण्याच्या या गाथेची तुलना जर अफगाणिस्तानशी केली तर, केवढा तरी विरोधाभास आढळतो. गेल्या गुरुवारीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन म्हणाले होते, की जरी तालिबानने काबूलपासून १५० किलोमीटर दूर असलेले गझनी शहर ताब्यात घेतले असले तरी, आणखी ९० दिवसातदेखील ते  काबूलला पोहोचू शकणार नाहीत. तालिबानी सैन्यापेक्षा दुप्पट ताकद असलेले बलाढ्य अफगाणी सैन्य त्यांचा प्रतिकार करेल! मात्र, प्रत्यक्षात काय घडलं?

याउलट, जेंव्हा पाकिस्तानने जम्मू -काश्मीर राज्याच्या मुझफ्फराबाद या एका मोर्चावर हल्ला केला होता तेंव्हा त्यांचे सैन्यबळ काश्मीर राज्याच्या एकूण सैन्यापेक्षादेखील अधिक होते. पाकिस्तानच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या जमातींमधील सुमारे २०००० टोळीवाल्यांना पाकिस्तानी सैन्याने शस्त्रे आणि नेतृत्व पुरवून, काश्मीरमध्ये घुसवले होते. त्यात ब्रिटिश सैनिकांची मदतही होतीच. काश्मीर सैन्यदलाच्या एकूण सैनिकांची संख्या होती केवळ १००००! आणि लखनपूर ते लडाख पर्यंत पसरलेल्या १००० किलोमीटर लांब सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. 

पुन्हा अफगाणिस्तानचा विचार केला तर, १२ ऑगस्ट रोजी तालिबानी सैनिक गझनीमध्ये म्हणजे काबूलपासून १५० किलोमीटर अंतरावर होते. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी काबूल ताब्यात घेतलेम्हणजे केवळ ३ दिवसांच्या आत! त्याउलट, ७४ वर्षांपूर्वी, काश्मीर युद्धात काय घडले होते? मुझफ्फराबाद ते श्रीनगर अंतर होते १२५ किलोमीटर. परंतु, तेथपर्यंत पाकिस्तानी घुसखोर पोहोचूच शकले नाहीत. महाराजा हरिसिंगांच्या आदेशानुसार, 'बंदुकीतली  शेवटची गोळी झाडली जाईस्तोवर, आणि त्यानंतरही शेवटच्या सैनिकाच्या कुडीत प्राण असेतोवर' डोग्रा सैन्य लढले. ब्रिगेडियर राजेंद्रसिंह यांच्या हौतात्म्यानंतरही, ५ दिवसात पाकिस्तानी घुसखोर कशीबशी बारामुल्लापर्यंत, म्हणजे ८० किलोमीटरची मजल मारू शकले! 

मला राहून-राहून आश्चर्य याचेच वाटते की, एकविसाव्या शतकातल्या, आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या आणि बलाढ्य अमेरिकी सैन्याच्या छत्रछायेत दोन दशके राहिलेल्या अफगाण सैन्याने नेमके काय केले? अफगाणिस्तानचे अध्यक्ष तर अफगाणिस्तान सोडून निघूनच गेले.

मला हे सांगताना अभिमान वाटतो की माझ्या हयातीतच मला हा विरोधाभास पाहता आला. 

थोडी हळहळदेखील वाटते, आणि ती अशासाठी की ज्या कडव्या डोगरा सैनिकांनी काश्मीर वाचवण्यासाठी आपल्या जीवाचे रान केले, ते मात्र आज विस्मृतीत गेले आहेत. 

आणि म्हणूनच 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमातून त्या वीरांची आठवण आपण पुन्हा जागृत करीत आहोत, यासाठी पंतप्रधानांचे शतशः आभार.

मूळ इंग्रजी लेखक: अज्ञात 

मराठी अनुवाद:     कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

27 comments:

  1. Thanks for sharing. Good information.

    ReplyDelete
  2. चांगली माहिती!धन्यवाद 🙏🙏

    ReplyDelete
  3. Very interesting parallel.Thanks for the article Colonel. I feel that Indian soldiers dont get the recognition they deserve - for instance we fought with distinction in second World War in multiple theatres but not much is said about it.
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. True.
      Efforts are afoot to make sure our heroes don't go unsung. 🙂

      Delete
  4. Excellent article, this shows our Army's determination

    ReplyDelete
  5. Nice to know many facts sir. Nicely narrated. Thabks

    ReplyDelete
  6. Thx for information and updating with the facts. It proves that Dedication, devotion and loyalty is the base of Indian society.

    ReplyDelete
  7. Satyan Ghumatkar20 August 2021 at 10:47

    Very nice article sir.

    ReplyDelete
  8. या कथेमुळे काश्मिरचा हरिराजा पळून गेला नाही हे सत्य समजल्याचा जास्त आनंद झाला.सत्य कधी ना कधी उघडाकिस येते याचा प्रत्यय आला.

    ReplyDelete